आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

PUNE CRIME : त्यानं नको ती गोळी खाल्ली अन आपल्या अल्पवयीन मैत्रिणीवरच केला अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना…! 

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी 

शारीरीक आकर्षणातून आजकाल वेगवेगळे प्रयोग करतात. त्यात क्षमता वाढीच्या गोळ्या खाण्याकडे कल वाढला आहे. पुण्यात तर एका बहाद्दराने सेक्स पॉवरची गोळी खाल्ल्याचं कारण देत आपल्याच एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित पिडिता नकार देत असताना मी गोळी खाल्ली आहे, काही केलं नाही तर मरेल अशी भिती दाखवल्याचेही समोर आले आहे. 

या प्रकरणी संकेत चव्हाण या २० वर्षीय तरुणावर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पिडितेच्या आईने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. याबाबत माहिती अशी की, संकेत आणि पिडीत मुलीची इन्स्टाग्राम या सोशल साईटवर ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरु झालं. त्यानंतर संकेतने या मुलीला भेटण्यासाठी गळ घातली. 

संबंधित मुलीला त्याने एका हॉटेलमध्ये बोलवले. त्या ठिकाणी त्याने मी सेक्स पॉवरची गोळी खाल्ली आहे. त्यामुळे काहीतरी करावे लागेल असं म्हणत तिला शारीरीक संबंधासाठी आग्रह केला. मात्र मुलीने त्याला नकार दिला. त्यावर त्याने मी गोळी खाली आहे, काहीच केलं नाही तर मरुन जाईल असं म्हणत तिला भिती घातली आणि तिच्याशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. 

डिसेंबर महिन्यात हा प्रकार घडला. संबंधित पिडितेने घरात याबद्दल माहिती दिल्यानंतर तिच्या आईने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संकेत चव्हाण याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us