आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

क्वारंटाईन असतानाही धनंजय मुंडे ऍक्शन मोडवर; महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीस ऑनलाइन उपस्थिती

राजकारण
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

कोविडची बाधा झाल्याने पुणे येथील निवासस्थानी क्वारंटाईन राहून उपचार घेत असलेले कृषिमंत्री धनंजय मुंडे आज ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांनी घरूनच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या ११३ व्या बैठकीस ऑनलाइन पध्दतीने उपस्थिती लावली.

या बैठकीत कृषी परिषदेच्या ११२ व्या बैठकीचा कार्यपूर्ती अहवाल व इतिवृत्त मंजुरीसाठी सादर करण्यात आले. कृषिमंत्री धनंजय मुंडे हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

धनंजय मुंडे हे मागील ५ ते ७ दिवसांपासून कोविड बाधित असून ते पुणे येथील निवासस्थानी उपचार घेत आहेत. आजपासून त्यांनी ऑनलाइन पद्धतीने कामकाजास सुरुवात केली आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण

दैनिक बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा

नवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांबद्दल प्रथम शोधा

सबस्क्राईब
Back to top button
Contact Us