आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

मोठी बातमी : मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश निघणार..? राज्य सरकार विशेष अधिवेशन घेण्याच्या विचारात; मंत्रीमंडळ बैठकीत होणार निर्णय..!

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. राज्यात काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. अशातच आता आरक्षणाबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. आज मंत्रीमंडळ बैठकीत मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याच अनुषंगाने राज्य शासनाकडून विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी केली जात असल्याची माहिती मिळत आहे.

मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्री उपसमितीची काल बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत न्या. शिंदे समितीचा प्राथमिक अहवाल मंत्रीमंडळ बैठकीत स्वीकारला जाणार असल्याची माहिती दिली होती. एकूण राज्य शासनाकडून मराठा आरक्षणाबाबत जोरदार हालचाली सुरु असल्याचं या निमित्तानं समोर आलं होतं.

आज दुपारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याबाबतही या बैठकीत चर्चा होवू शकते अशी माहिती मिळत आहे. आजच मराठा आरक्षणावर तोडगा काढला जावा या अनुषंगाने सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती मिळत आहे.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us