आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

PMPML Bus | आनंदाची बातमी : पुण्यातील बस प्रवाशांची मोठी चिंता मिटली; सुरू झाली ‘ही’ नवीन सुविधा

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी  

पुणे शहर वाहतूक सेवेत दिवसेंदिवस विविध सुधारणा केल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. पुणेकरांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) बस सेवेने नवीन सुविधा आणली आहे. या सुविधेचा पुणेकरांना चांगलाच फायदा होणार असून  त्यांचे मोठे टेन्शन कमी होणार आहे.

पीएमपीएमएलने रविवारपासून आपल्या बसेसमध्ये कॅशलेस तिकिटाची सुविधा सुरू केली आहे. यामाध्यमातून  पीएमपीएमएल बसमध्ये ऑनलाईन पेमेंटद्वारे तिकीट काढता येणार आहे.  यूपीआय क्युआर कोड स्कॅन करून प्रवासी आता तिकिटांचे पैसे देऊ शकतात. तसेच गुगल पे, फोन पे यासारख्या पेमेंट अ‍ॅपचा वापर करून तिकीट काढता येणार आहे.

पीएमपीएमएलने तिकिटांसाठी कॅशलेस सेवा सुरू करण्याआधी दि. १६ ते ३० सप्टेंबरदरम्यान बाणेर डेपो अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेतली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर शहरातील सर्वच बससेवेत हा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे या सेवेमुळे आता सुट्या पैशांवरुन प्रवाशी आणि कंडक्टर यांच्यात होणारे वाद कमी होणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us